Friday, February 10, 2012

Are we Really Proud Of our Culture

सहज रस्त्यावरून चाललो होतो.स्वारगेट जवळ मी एका मुलाला पाहिलं.तो त्याच्या आई बरोबर चालला  होता .आई जरा काळजीत वाटत होती .
चेहेरा तरी तसा वाटत होता  आणि मुलगा आईला धीर देत होता .मुलगा असेल साधारण १६-१७ वर्षाचा .आणि त्याने आई च्या खांद्यावर हात ठेऊन आईला समजवायचा प्रयत्न चालवला होता .
मला त्या मुलाचं कौतुक वाटल ,आणि त्या आई चा हेवा.
फार लवकर त्या मुलाला कळाल कि आईला त्याची गरज  कधी आणि का असू शकते?....
मग मला एक दुसरा  प्रसंग आठवला ...मी एकदा मामा च्या गावाला गेलो होतो तेव्हा तिथे गावात फिरत असताना मला दिसला कि एक म्हातारी बाई एका घराबाहेर बसून घराकडे  पाहून  जेवणा साठी ओरडत होती .
नंतर मी विचारपूस केल्यावर कळलं कि ते तिचेच घर होते .आणि तिच्या मुलाने आणि सुनेने तिला घराबाहेर ठेवले होते .तिचे सगळे जेवण  आणि झोपणे घराबेरच होत होते........
हा माझ्या साठी झटकाच होता .एक मुलगा आपल्या आई बरोबर असा कसा वागू सकतो ?????एक स्त्री दुसऱ्या स्त्री बरोबर असी कसी वागू सकते.....
असा तो मुलगा का वागला ह्याचा मी विचार करू लागलो......आई आता काम कारेणाशी झाली कि द्या तिला टाकून घराबाहेर ..असा त्याने विचार केला असेल का?
आपण ...use and throw जामाण्या मध्ये एवढे सरसावलो का ???
 उद्या जर त्या माणसाच्या मुलाने त्याला असाच घराबाहेर ठेवा तर ह्यात त्या मुलाची काही चूक होईल का?
आपण आपल्या मुलांपुढे काय संस्काराची शिदोरी ठेवणार आहोत ?
मला वाटत .....................
आज खर्या अर्थाने तुकाराम आणि  ज्ञानेश्वरांची गरज आहे.........तेच सांगू  शकतील कि........."भूता परस्परे जडो  मैत्र जीवांचे "  म्हणजे नक्की  काय असतं.................................... 

No comments:

Post a Comment